Pune Pandav Nagar Crime | जुन्या वादातून मित्रावर कोयत्याने वार, पांडवनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pandav Nagar Crime | जुन्या वादाचा राग मनात धरुन मित्राला चहा पिण्यासाठी बोलावून घेत डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील पाडंवनगर येथे घडली आहे (Attempt To Murder). ही घटना शुक्रवारी (दि.29) दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजण्याच्यादरम्यान गोलंदाज चौकाजवळ (Golandaj Chowk Pune) घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जखमी शंकर बादशहा मिरेकर (वय-42 रा. जुनी वडारवाडी, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन किशोर गोविंद धोत्रे (वय-36 रा. वैदुवाडी पोलीस चौकी समोर, शंकरमठ, हडपसर) याच्यावर आयपीसी 307, 504, 34 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्यात पूर्वी वाद झाला होता. याचा राग किशोर धोत्रे याच्या मनात होता. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता आरोपीने शंकर याला चहा पिण्यासाठी बोलावुन घेतले. त्यानंतर त्याच्यासोबत वाद घालून टोकदार लोखंडी रॉडने पायाच्या पिंडरीजवळ व मानेवर खुपसुन जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करत गाडीच्या डीकीतुन कोयता काढून शंकरच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केकान करीत आहेत.

किरकोळ कारणावरुन तरुणाला मारहाण

पुणे : सार्वजनिक टॉयलेट-बाथरुम समोर असलेला मातीचा ढिग व इतर सामान काढून घेण्यास सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले.
हा प्रकार गुरुवारी (दि.28) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास जनवाडी येथे घडला (Janwadi Pune).
याबाबत अजय दिलीप विटकर (वय-30 रा. गोखलेनगर, जनवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन सुमित अनिल भोसले, आदित्य चंदु खुडे (दोघे रा. गोखलेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | बारामतीत लढायचे की नाही? आज शिवतारेंची सासवडमध्ये बैठक, कार्यकर्त्यांना विचारून घेणार निर्णय

Pune Kondhwa Crime | तरुणीला कीस करुन अश्लील चाळे, कोंढवा परिसरातील घटना

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune News | पोलीस यंत्रणा एफ.एफ.सी.पी. मुस्कान संस्थेमार्फत पथनाट्य सादर करुन जनजागृती

Rohit Pawar | ”अनेकजण परत येण्यास इच्छूक, हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है”, रोहित पवारांचे वक्तव्य चर्चेत