पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा – वाल्हा रस्ता पुन्हा बनला मृत्यूचा ‘सापळा’

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा ते वाल्हा या रस्त्यावरील व पाडेगांव (ता. खंडाळा) हद्दीत अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याने वाहन चालविताना वाहनचालक आणि प्रवासीही हैराण झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या मुुुळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यातील नीरा, पिंपरे खुर्द गावातून जाणाऱ्या पुणे – पंढरपुर पालखी मार्गावर जागोजागी मोठे-मोठे खड्डे पडल्याने दुचाकी चालकांचे अनेक अपघात झाले आहेत.

नीराहून पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नीरा व पिंपरे खुर्द गावच्या हद्दीवर असलेल्या एका गॅरेजसमोर मोठे-मोठे खड्डे पडल्याने येथून जाणाऱ्या अनेक दुचाकीचालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने ऐन दिवाळीच्या सणासुदीत अपघाताला सामोरे जावे लागले. तसेच नीरा ते वाल्हा रस्त्याच्या अनेक ठिकाणच्या साईडपट्टया अरुंद असल्याने या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने दुचाकीच्या नुकसानीसह चालकांना दुखापत होत असल्याने पुणे पंढरपूर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

तसेच नीरा गावातील शिवाजी चौक परिसरात, नीरा रेल्वे स्टेशन समोर, बसस्थानक, पोलिस स्टेशन समोरही मोठे-मोठे खड्डे पडलेले असून नीरेतील पालखी तळापासून जाणाऱ्या सातारा – नगर रस्त्यावरील ठिक-ठिकाणी पडलेले खड्डे बारामतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या महिन्यांत बुजविलेले होते. ते खड्डे बुजविताना त्याचा दर्जा राखला गेला नसल्याबाबत नीरेतील ग्रामस्थांनी त्यावेळी तक्रारी केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने त्या ठिकाणी मात्र पुन्हा खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरूनही वाहने चालविणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे पुणे – पंढरपूर पालखी मार्गावरील पिंपरेखुर्द व नीरा गावातून जाणाऱ्या रस्त्यावर तसेच नीरा गावातील पालखी तळासमोरून जाणाऱ्या सातारा – नगर रस्त्यावर तसेच पाडेगांव (ता.खंडाळा) येथील जुना टोल नाका, पाडेगाव कॅनाॅलजवळील रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने तातडीने हे खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहे.

ग्रामस्थांच्या मदतीने नीरा पोलिसांनी बुजविला ‘तो’ खड्डा
पुणे पंढरपूर पालखी मार्गावर पिंपरेखुर्द गावच्या हद्दीतील एका गॅरेजसमोरच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने तेथे सतत अपघात होत होते. या खड्डयांचा अंदाज दुचाकीस्वारांना येत नसल्याने दुचाकी खड्ड्यात जोरदार आदळल्याने दोन ते तीन जोडप्यांना दुखापत झाली होती. त्यामुळे नीरा पोलिस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब बनकर, पोलिस हवालदार विनोद हाके, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ‘तो’ खड्डा बुजविला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कारभार संथगतीचा
पुणे – पंढरपूर पालखी मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्याने या मार्गावरील नीरा ते वाल्हा गावच्या हद्दीतील खड्डे, अरूंद साईडपट्ट्यांमुळे अनेक अपघात घडले. मात्र महामार्ग प्राधिकरण तातडीने याकडे कार्यवाही करीत नाही. त्यामुळे प्राधिकरणाच्या संथगतीच्या कारभाराविषयी नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या