Pune-Pandharpur Road Accident | पुरंदर तालुक्यात बस-दुचाकीची जोरदार धडक; भीषण अपघातात दोघे ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Pandharpur Road Accident | पुणे-पंढरपूर मार्गावर एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात (Pune-Pandharpur Road Accident) दोन जण जागीच ठार (Died) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुरंदर तालुक्यातील नीरा जवळील पिंपरे (खुर्द) येथे घडली. हा अपघात काल (गुरूवारी) रात्रीच्या सुमारास घडला आहे. विजय काळे (Vijay Kale) (रा. सुकलवाडी) व नाना भुजबळ (Nana Bhujbal) (रा. माळवाडी) असं अपघातात मृत्यू झालेल्यांचे नावे आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, पिंपरी चिंचवड ते गाणगापूर ही रातराणी बस (क्रमांक MH-14 BT. 3466) गाणगापूरकडे निघाली होती. विजय काळे व नाना भुजबळ हे दोघेजण मोटासायकल (क्रमांक MH-12 H.H.3072) या मोटार सायकलवरून सुकलवाडी कडे निघाले होते. पिंपरे येथील जया हॉटेल समोर आले असता एसटी आणि मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात (Accident) घडला.

 

दरम्यान, या अपघातात काळे आणि भुजबळचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत माहिती समजताच पोलीस (Police) घटना स्थळी दाखल झाले असून दोघा मृतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Pune-Pandharpur Road Accident | two died in st bus and two wheeler accident at pimpre of purandar taluka on pune-pandharpur road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणूक ! 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात, आज फैसला

 

Gold Silver Price Today | सोन्यात तेजी तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

 

Pune MHADA Lottery 2022 | पुण्यात म्हाडाकडून तब्बल 5 हजार घरांची सोडत; जाणून घ्या सोडत कधी निघणार अन् अर्ज प्रक्रिया