Pune : ‘प्रेसिजन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंडिया’ (PARI) कंपनीचे सहसंस्थापक मंगेश काळे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेसिजन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंडिया (पीएआरआय) कंपनीचे सहसंस्थापक मंगेश काळे यांचे निधन झाले आहे. मंगेश काळे यांच्या अकाली निधनामुळे वैयक्तिक पातळीवर आणि उद्योगजगतालाही तोटा झाल्याची भावना उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

पुण्यातील अभियंता मंगेश काळे यांनी 1992 मध्ये पॅरी रोबोटिक्सची निर्मिती केली होती. त्याद्वारे उत्पादकांना ऑटोमेशन सेवा पुरवली जाईल, त्यामुळे उद्योजकांमध्ये चांगली कार्यक्षमता वाढेल आणि जास्त नफा वाढेल असा उद्देश होता. पॅरी ही भारतातील सर्वात मोठी ऑटोमेशन कंपनी आहे. या कंपनीची वार्षीक उलाढाल 500 कोटी रुपये आहे.

मंगेश काळे हे अनेक वर्षे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MCCIA) च्या कार्यकारी समितीचे सदस्य होते आणि काही काळ ऑटोमेशन समितीचे अध्यक्ष होते. ते चीन आणि जर्मनी येथील एमसीसीआयएच्या व्यवसाय प्रतिनिधीचे प्रतिनिधीत्व करत होते. तसेच आयटी फॉर मॅन्युफॅक्चरिंग या उपक्रमात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली.

मंगेश काळे हे भारत आणि परदेशातील बऱ्यात उद्योजकांना प्रेरणा देणारे आणि ऑटोमेशन क्षेत्रातील सर्वात मोठे नाव होते. दृढनिश्चयी आणि अभियांत्रीबद्दलची सखोल माहिती, तसेच ग्राहकांप्रती आपुलकी यासाठी ते ओळखले जात होते. भारतात आणि जागतिक पातळीवर त्यांनी ऑटोमेशनवर अनेक व्याख्याने दिली आहे.