Pune : पुण्यातील मार्केटयार्डामधील पार्किंग शुल्क अन् भाडे आकारणीला स्थगिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येथील बाजार समितीतील फळे व भाजीपाला विभागात तीन व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग शुल्क आकारण्याचा तसेच परिसरात असलेल्या विविध संघटनांच्या कार्यालयांना भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र याला विविध कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवल्याने बाजार समितीने Market Committee या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

फळे व भाजीपाला विभागात शेतमाल घेवून येणाऱ्या वाहनांकडून काही लोक अनधिकृतपणे पैशांची वसुली करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे बाजार समितीने Market Committee पार्किंगला जागा व वाहनांना सुरक्षा पुरवून पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ज्या कामगार संघटनांची कार्यालये बाजार समितीत आहेत त्यांच्याकडून मासिक भाडे आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कामगार संघटनांनी कार्यालयाच्या भाड्यावरून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, आडते असोसिएशनचे बाजार समिती प्रशासनाला पत्र दिले होते त्यामध्ये त्यांनी सध्या लॉकडाऊनमुळे व्यापार घटला आहे. त्यामुळे कोरोना काळात या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे म्हंटले होते. त्यामुळे दोन्ही निर्णय तात्पुरते स्थगित केले आहेत, अशी माहिती बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी