ADV

Pune Parking Updates | भारती विद्यापीठ, बंडगार्डन, कोथरूड, चतु:श्रृंगी व येरवडा परिसरातील पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल

पुणे: Pune Parking Updates | वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील भारती विद्यापीठ, बंडगार्डन, कोथरूड, चतु:श्रृंगी व येरवडा वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

येरवडा वाहतूक विभागांतर्गत संगम वर्ड सेंटर ऑफ द वर्ल्ड असोसिएशन ऑफ गर्ल गाईड्स आणि गर्ल स्कॉट येरवडा या आस्थापनेच्या गेटच्या समोरील सेवा रस्त्यावर गेटच्या दक्षिण बाजूला २० मीटर व उत्तर बाजूला ५० मीटर अंतर नो पार्कीग करण्यात येत आहे.

भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत कात्रज बायपास वरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कात्रज बायपास ते भारती विद्यापीठ लोखंडी पूलापर्यंत नो पार्कीग करण्यात येत आहे. कात्रज बासपासचे पुढे सेवा रस्त्यावरील आयसीआयसीआय बँक कॉर्नर ते गुळाचा चहा १०० मीटर पर्यंत दुचाकी वाहनांकरीता अँग्युलर पार्किंग करण्यात येत आहे. कात्रज बायपासच्या पुढे सर्विस रस्त्यावरील काव्या हॉटेल ते प्रतिक हॉटेल ७० मीटरपर्यंत दुचाकी वाहनांकरीता अँग्युलर पार्कीग करण्यात येत आहे. तसेच सावंत विहार ते कात्रज डेअरी गेट नंबर ३ पर्यंत २०० मीटर नो पार्किंग करण्यात येत आहे.

बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत पोलीस आयुक्त कार्यालय गेट क्रमांक ३ ते किराड चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येत आहे. कोथरूड वाहतूक विभागांतर्गत तनमन डेअरी, न्यू फ्रेंडस बिल्डिंग ते एच.डी.एफ.सी. बँक शेजारील सावली बंगला दरम्यान दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे.

चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत बाणेर म्हाळुंगे रस्त्यावरील सर्व्हे नंबर ११६/३/२/४ बाणेर सिझेंटा चौक ते सायकर चौक दरम्यान एमराल्ड पार्क लेन पुणे येथे एरिया टॉवर ते रिद्धी सिद्धी बंगलादरम्यान ५०० मीटर पर्यंत नो पार्किंग, नो हॉल्टींग झोन करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ७ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरातून चार पिस्टल व सहा काडतुसे जप्त, तिघांना अटक

Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती हद्दपार करा, नाहीतर रस्त्यावर उतरु – धीरज घाटे (Video)

Pune Crime News | पुणे : मोबाईल चोरीचे कनेक्शन थेट चीनपर्यंत, स्वारगेट पोलिसांची कारवाई

Yerawada Pune Crime News | पुणे : बहिणीला पळून नेल्याच्या कारणावरुन तरुणीच्या भावाकडून ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, येरवडा परिसरातील घटना