मावळमध्ये राष्ट्रवादीचे पार्थ अजित पवार पराभवाच्या छायेत तर बारामती, शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी आघाडीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवार यांचे नातु पार्थ अजित पवार हे तब्बल ४४ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांना पिछाडीवर टाकले आहे. पार्थ पवार पिछाडीवर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्‍का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर पहिल्यादा पार्थ पवार हे काही मतांनी पुढे होते. मात्र, श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा मुसंडी मारली असुन आता श्रीरंग बारणे हे तब्बल ४४ हजार मतांनी पुढे आहेत. पार्थ पवार पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा मतमोजणीच्या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे हे तब्बल ४० हजार मतांनी पुढे आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे या आघाडीवर असुन भाजपला कांचन कुल या पिछाडीवर आहेत. पुणे लोकसभा मतदार संघातुन भाजपचे गिरीश बापट हे आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे मोहन जोशी हे पिछाडीवर आहेत.