Pune Parvati Crime | पुणे : लघुशंका करण्यावरुन दोन गटात राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Parvati Crime | घरासमोरील ओढ्याजवळ लघुशंका करत असताना हटकल्यानंतर तरुणाने माफी मागितली. तरी देखील तरुणाला शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Marhan) करुन डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार 30 मार्च रोजी अरण्येश्वर नगर (Aranyeshwar Nagar) येथे सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत इम्रान अमरुल्ला खान (वय-22 रा. तावरे कॉलनी, अरण्येश्वर नगर) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राकेश लक्ष्मण तोंडे, कौशल उर्फ सोन्या कुंजीर, ऋषिकेश मोडवे (सर्व रा. अरण्येश्वर नगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 324, 323, 336, 504, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी इम्रान खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.(Pune Parvati Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान याने त्याच्या घरासमोर असलेल्या ओढ्याजवळ लघुशंका केली. त्यावेळी राजेश तोंडे याच्या आईने इम्रान याला हटकले. इम्रान याने कान पकडून सॉरी माझे चुकले असे म्हणत माफी मागितली. त्याचवेळी आरोपी त्याठिकाणी आले आणि त्यांनी इम्रानला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच दगड फेकून मारुन जखमी केले. आरोपींनी इम्रान याच्या घरात शिरुन घरातील सामानाची तोडफोड केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के.के. कांबळे (PSI KK Kamble) करीत आहेत.

तर राजेश लक्ष्मण तोंडे (वय-35) याने दिलेल्या तक्रारीवरुन इम्रान अमरुल्ला खान, मुबारक वसीम खान, जमीला खान,
मुस्कान खान (सर्व रा. तावरे कॉलनी, अरण्येश्वर नगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार
गुन्हा दाखल केला आहे. राजेश तोंडे याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी इम्रान हा घरासमोर लघुशंका करीत होता.
त्यावेळी आईने त्याला हटकले असता त्याने तुम्हाला संध्याकाळी दाखवतो अशी धमकी दिली.
तर मुबारक याने आईसोबत वाद घालून तिला मारण्यासाठी दगड उचलला असता त्याला आडवले.
मुबारक याने डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच इतर आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Andolak-Ashok Chavan | संतप्त मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांची गाडी आडवली, जोरदार घोषणाबाजी, अखेर माघारी फिरले

Police Inspector Arrested In Robbery Case | व्यावसायिकाचे दोन कोटी लुटल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकाला अटक, पोलीस दलात प्रचंड खळबळ