Pune Parvati Land Case – Sangli Crime | कोटयावधींची फसवणूक केल्याप्रकरणी ऋषीकेश बारटक्के, नितीन शहा, बिल्डर आदित्य दाढेसह चौघांविरूध्द गुन्हा

सांगली : पर्वती येथील वादग्रस्त जमिनी प्रकरणात (Parvati Land Case Sangli) ज्यांच्या तक्रारीवरुन माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे (RTI Activist Ravindra Barhate), बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश जगताप (Shailesh Jagtap), पत्रकार देवेंद्र जैन (Devendra Jain) यांच्यासह अनेकांवर मोक्का कारवाई (MCOCA Act) Mokka Action करण्यात आली, त्यात ऋषिकेश बारटक्केसह (Rishikesh Bartakke) (रा.बाणेर, मायाेला रेसीडेंसी, पुणे), बांधकाम व्यवसायिक आदित्य दाढे Builder Aditya Dadhe (मुकुंदनगर, स्वारगेट, पुणे), निलमणी धैर्यशील देसाई (Nilamani Desai), नितीन सुभाष शहा Nitin Subhash Shah (सदाशिव पेठ, पुणे) यांच्यावर सव्वातीन कोटींची फसवणुक (Fraud Case) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. (Pune Parvati Land Case – Sangli Crime)

 

याप्रकरणी आबासाहेब दत्ताजीराव देशमुख Abasaheb Dattajirao Deshmukh (वय ६२, रा. माहुल, ता. खानापूर, जि. सांगली) यांनी विटा पोलीस ठाण्यात (Vita Police Station) फिर्याद (गु.रजि. नं. ४७७/२२) दिली आहे. त्यानुसार, ऋषिकेश अशोक बारटक्के (रा. बाणेर), नितीन सुभाष शहा (रा. सदाशिव पेठ), आदित्य दाडे (रा. मुकुंदनगर, पुणे) आणि निलमणी धैर्यशील देसाई (रा. बाणेर रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषिकेश बारटक्केशी (Criminal) संबंध ठेवून त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे, कपडे घेतल्याने पोलीस हवालदार शैलेश जगताप (Police Constable Shailesh Jagtap), परवेज जमादार (Parvez Jamadar) यांना पोलीस दलातून (Police Force) बडतर्फ करण्यात आले होते. निलमणी देसाई यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली होती. त्यावरुन माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे, बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप, पत्रकार संजय भोकरे Sanjay Bhokare (रा. सांगली), परवेझ जमादार, पत्रकार देवेंद्र जैन, जयेश जगताप, प्रशांत जोशी, प्रकाश फाले, विशाल तोत्रे, प्रेमचंद रतनचंद बाफना, प्रशांत बाफना, हरिष बाफना अशा अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश जगताप याने निलमणी देसाई यांना ऋषिकेश बारटक्के यांनाच जमीन विका असे धमकविले होते.. त्यानंतर जमीन विक्रीचा व्यवहार (Pune Parvati Land Case – Sangli Crime) ठरला. त्यानंतर आरोपींनी बारटक्के याला धमकावुन २० लाख रुपये जबरदस्तीने घेतल्याचे या फिर्यादीत म्हटले होते.

विटा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार,
फिर्यादी आबासाहेब देशमुख यांची २०१५ मध्ये पुण्यात वैद्यकीय उपचारासाठी आले असतना नितीन शहा यांच्याशी ओळख झाली.
शहा यांच्याबरोबर ऋषीकेश बारटक्के त्यांच्याकडे येत होते. ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांनी बारटक्के याने निलमणी देसाई यांच्याकडून पर्वती येथील जमिनीचे कुलमुख्यत्यारपत्र घेतले आहे.
या जागेमध्ये असलेल्या महसुलच्या अडीअडचणी दूर करण्याकरीता व जागेमध्ये इतर कामे करण्याकरीता अंदाजे ४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
या जागेवर गुंतवणुक केल्यास गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर ३ महिन्यात दीड पट मोबदला देण्याचे आमिष दाखविले.

तसेच त्यांनी नवीन चारचाकी अलिशान वाहन देतो, असे देशमुख यांना आमिष दाखविले.
यावेळी त्यांनी आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, असे सांगितले.
त्यावर तुमचे माहुली गावात संबंध आहेत त्यांच्याकडून पैसे जमवून द्या असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी व गावातील लोकांनी पर्वती येथील ४९ गुंठे जमीन जागा पाहिली.
तेथे सदरील जागेचे मालक निलमणी धैर्यशील देसाई यांच्या मालकी नावे वहिवाटीची असून “सदर जागेत कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा बोर्ड लावलेला होता.
हे पाहून त्यांनी त्या जागेत गुंतवणुक करण्याचे मान्य केले.
त्यानुसार, फिर्यादी १ कोटी ५१ लाख रुपये तसेच अन्य १२ जणांनी १ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये ऋषीकेश बारटक्के व नितीन शहा यांना दिले.
त्यावेळी ऋषीकेश बारटक्के याने त्यांच्या नावे असलेली फोर्ड इंडिव्हेअर ही फिर्यादी यांना दिली.
त्यांनी गाडीबाबत माहिती घेतल्यावर त्या गाडीवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा
(State Bank of India) बोजा असल्याचे समजले.

त्यानंतर त्यांनी व इतर गुंतवणुकदारांनी वारंवार बारटक्के व नितीन शहा यांच्याकडे पैशांची मागणी केली.
तेव्हा त्यांनी या जागेबाबत वृत्तपत्रात आलेली जाहिरात पाठवून दिली.
त्यांनी आदित्य दाढे यांना ही जागा विक्री (Parvati Land Case Sangli) करणार असल्याचे सांगितले.
बारटक्के याने आदित्य दाढे यांची भेट घालून दिली.
आमचे अ‍ॅग्रीमेंट झाले असून त्या जागेचा व्यवहार होताच तुम्हाला दीडपट पैसे देणार असल्याचे सांगतले.
मात्र आजपर्यंत त्यांनी पैसे न दिल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.

Web Title :-  Pune Parvati Land Case – Sangli Crime | fraud Case against Rishikesh Bartakke, Nitin Shah, builder Aditya Dadhe and four others for cheating crores of rupees in vita police station sangli district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा