Pune Parvati Police | कर्नाटकमधील कुख्यात धर्मराज चडचंण (डीएमसी) टोळीचा म्होरक्या मड्डु उर्फ माडवालेय्या हिरेमठला पुण्यात 3 पिस्तुल आणि 25 जिवंत काडतुसांसह अटक, पर्वती पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Parvati Police | कर्नाटकमधील कुख्यात धर्मराज चडचंण (डीएमसी) टोळीचा म्होरक्या मड्डु उर्फ माडवालेय्या हिरेमठ आणि त्याच्या दोन साथीदारांना पर्वती पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 3 देशी बनावटीचे पिस्तुले 25 जिवंत काडतुसे, गुन्हयात वापरलेली गाडी आणि 5 मोबाईल असा एकुण 11 लाख 90 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Parvati Police Station)

माडवालेय्या पंचय्या हिरेमठ (35, रा. एपीएमसी मार्केटजवळ, बंबलक्ष्मी, इंडी रोड, ता.जि. विजापूर, कर्नाटक. सध्या रा. इलेवन पार्क, पिसोळी, उंड्री, पुणे), सोमलिंग गुरप्पा दर्गा (28, रा. एम.बी. पाटीलनगर, सोलापुर रोड, विजापुर, ता.जि. विजापुर. मुळ रा. जालगेरी, ता.जि. विजापुर) आणि प्रशांत गुरूसिध्दप्पा गोगी (27, रा. गल्ली नं. 2, शिवशंभो नगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे. मुळ रा. मु.पो. देवगत, जुन्या मस्जिदजवळ, ता. सुरपुर, जि. यादगीर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रे, अग्नीशस्त्रे जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत. त्यापार्श्वभुमीवर पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत कुख्यात धर्मराज चडचंण (डीएमसी) टोळीच्या म्होरक्याबाबत माहिती मिळाली होती.

प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर वपोनि गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांची 4 पथके तयार करून नगर रोड ते पर्वतीहद्दीपर्यंत सापळे रचले होते. संशयित हे लक्ष्मीनारायण टॉकीज जवळ आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला 3 देशी बनावटीचे पिस्तुल व एकुण 25 जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी अग्नीशस्त्रांसह गुन्हयात वापरलेले वाहन आणि 5 मोबाईल असा एकुण 11 लाख 90 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार करीत आहेत.

पर्वती पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, उत्तर कर्नाटकमधील कुख्यात धर्मराज चडचंण व महादेव बहिरगोंड (सावकार) या टोळयांमध्ये वाद आहे. त्यापैकी धर्मराज चडचंण याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला असुन त्याचा भाऊ गंगाधर चडचंण यांचा खून महादेव सावकार याच्या टोळीने केलेल्या संशयातुन मड्डु उर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठने धर्मराजची (डीएमसी) नावाची गुन्हेगारी टोळी सक्रिय ठेवली. त्याचा म्होरक्या होवुन महादेव सावकारवर 40 साथीदार व 6 गावठी पिस्तुलासह सन 2020 मध्ये हल्ला केला होता.

सदरील हल्ल्यामध्ये सावकार टोळीचे दोघांचा खात्मा झाला. मात्र, महादेव सावकार बचावला होता. तेव्हापासुन मड्डु हिरेमठ हा सदरील टोळी चालवित असुन त्याने विजापुर जिल्हयात खून व खुनासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण केली आहे. सध्या तो पुण्यातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात मागील दोन महिन्यांपासुन त्याचे परिवारासह विरूध्द टोळीच्या भितीपोटी रहावयास आहे. पर्वती पोलिसांनी त्याच्या मुसक्या अवळून दमदार कामगिरी केली आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर आयुक्त प्रविण पाटील, पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त आप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार, पोलिस हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे-पाटील, पुरूषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, प्रविण जगताप, कुलदिप शिंदे, महेश जेधे, दत्तात्रय नलावडे, सुभाष मोरे, नानासाो खाडे, राकेश सुर्वे आणि वाहन चालक बनसोडे यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Datta Nagar Crime | ‘तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो’ ! पितापुत्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन जीव ठार मारण्याचा प्रयत्न

Fire At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवरील डब्याला मध्यरात्री आग; यार्डातील डबा जळून खाक, जीवित हानी नाही (Video)

TET Exam Scam | टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत