Pune : पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांचे मोबाईल चोरणार्‍या गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे स्थानक परिसरातील प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे तीन मोबाइल जप्त केले आहे.
दीपक ऊर्फ दिपू रमेश कांबळे (वय 20) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा एक साथीदार पसार झाला आहे.

शहरात कोरोना तसेच वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस ऑन ड्युटी 24 काम करत आहेत. यादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना पुणे स्थानक येथील तुकाराम शिंदे वाहनतळ जवळ दोन व्यक्ती चोरलेले मोबाईल विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने याची खातरजमा करत याठिकाणी सापळा रचला. दोघे संशयास्पदरीत्या थांबले असल्याचे दिसताच पोलीसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांनी पळ काढला. त्यातील दीपक कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतले तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी त्याच्या जवळ असलेल्या पिशवीची पाहणी केली. त्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल सापडले. त्याच्याविषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने हे मोबाईल चोरल्याचे सांगितले.

उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक निरीक्षक प्रकाश मोरे यांच्या पथकाने केली आहे.