पौड परिसरात कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या दोघांचा आर्थिक व्यवहारातून खून, दोघांची ओळख पटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीणच्या पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी गावाजवळ कुंडलिका व्हॅलीच्या दरीत ४ जुलै रोजी एका जळून भस्मसात झालेल्या एका कारमध्ये दोघांचे मृतदेह आढळले होते. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याता आला होता. तेव्हापासुन प्रकरणाचा तपास चालु होता. दरम्याज, आज (बुधवार) ही घटना आर्थिक व्यवहारातून झाल्याचे उघडकीस आले असून दोघांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही मृतदेहांची ओळख देखील पटली आहे.

विकास विलास गोसावी (२८, रा. निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) आणि विजय आबा साळुंके (३२, रा. बांधा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुभाष आबा साळुंके (३५, रा. बांधा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांनी फिर्याद दिली आहे. साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक देवु हिलम (रा. आदिवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) आणि त्याच्या इतर साथीदारांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष साळुंके यांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्यांचे भाऊजी विकास गोसावी आणि भाऊ विजय साळुंके यांचा अशोक हिलम आणि त्याच्या साथीदाराने आर्थिक व्यवहारातून खून केला. दोघांचा खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मृतदेह वॅगनर कारमध्ये (एमएच ०७ एजी १४७७) टाकले आणि ती कार पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी गावाच्या जवळील कुंडलिका व्हॅलीच्या दरीत ढकलून देण्यापुर्वी पेटवली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले. ४जुलै रोजी दरीमध्ये कार आढळूून आली आणि त्यामध्ये दोघांचे मृतदेह मिळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. तेव्हापासुन पौड पोलिस प्रकरणाचा तपास करीत होते. अखेर दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आणि त्यांचा खून हा आर्थिक व्यवहारातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पौड पोलिस करीत आहेत.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

You might also like