5 राज्यातील निवडणुका संपताच इंधनाच्या दरात ‘उसळी’; पेट्रोल 19 तर डिझेल 22 पैशांनी प्रति लिटर महागले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी लागल्यानंतर इतके दिवस कृत्रिमरित्या रोखून धरण्यात आलेल्या पेट्रोल डिझेलच्या दराने उसळी घेतली आहे. निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलमध्ये किरकोळ घट झाली होती.

तब्बल १९ दिवसांनंतर पेट्रोलच्या दरात लिटरमागे १७ पैशांनी वाढ झाली आहे. आजपासून शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर ९६.६२ रुपये असणार आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता १००.३० रुपये असणार आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर २२ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर आता ८६.३२ रुपये लिटर झाला आहे.