पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक ! पुण्यात 93.14 रुपये तर डिझेल 82.38 रुपये लिटर

पुणे : पेट्रोलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असून आज पेट्रोलच्या किंमतीने नवा उच्चांक निर्माण केला आहे. आज पेट्रोलच्या किंंमतीत २९ पैसे तर, डिझेलच्या दरात ३१ पैशांची वाढ झाली आहे. पुणे शहरात पेट्रोलचा दर आज ९३.१४ रुपये लिटर असणार आहे़ तर, डिझेलचा दर ८२.३८ पैसे असणार आहे.

आतापर्यंतचा पेट्रोलचा सर्वाधिक दर आहे. काँग्रेस सरकार असताना २०१३ च्या तुलने पेट्रोलने सर्व किंमतीचे सर्व उच्चांक पार केल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोशिएशनचे प्रवक्ते अलि दारुवाला यांनी सांगितले.पुणे शहरातील गेल्या १० दिवसात पेट्रोलचे दर कमी जास्त होऊन तब्बल एक रुपयांची वाढ झाली आहे.

३ फेब्रुवारी – ९२.८१ वाढ १३ पैसे
२ फेब्रुवारी – ९२.६८ वाढ ८ पैसे
१फेब्रुवारी – ९२.६० घट २८ पैसे
३१ जानेवारी – ९२.८८ वाढ १५ पैसे
३० जानेवारी – ९२.७३ घट ३७ पैसे
२९ जानेवारी – ९३.१० वाढ ६२ पैसे
२८ जानेवारी – ९२.४८ घट ५ पैसे
२७ जानेवारी – ९२.५३ वाढ १७ पैसे
२६ जानेवारी ९२.३६ वाढ २२ पैसे
२५ जानेवारी ९२.१४ घट ५६ पैसे