Pune Phone Tapping Case | पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने केले गेले फोन टॅपिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी (Pune Phone Tapping Case) न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील (Pune) बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) माजी पोलीस आयुक्त (Pune Former CP) रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. फोन टॅपिंग प्रकरणाच्या (Pune Phone Tapping Case) तपासात तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने फोन टॅपिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुन्हेगारांच्या (Criminals) नावाखाली राजकीय नेत्यांचे (Political Leaders) फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे (Crime Branch) तत्कालीन पोलीस उपायुक्तांची (DCP) पुणे पोलिसांनी (Pune Police) सोमवारी चौकशी (Inquiry) केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात जणांची चौकशी केली असून, त्यात पोलीस उपायुक्तांपासून ते तांत्रिक विश्लेषण विभागात Technical Analysis Wing (TAW) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

चौकशी करण्यात आलेले पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्या कालावधीत हा सर्व फोन टॅपिंगचा प्रकार (Pune Phone Tapping Case) झाल्यामुळे त्यांची देखील सोमवारी पुणे पोलिसांनी चौकशी केली. यापूर्वी तांत्रिक विश्लेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (Police Inspector) व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत.

या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये हे फोन टॅपिंग कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आले, त्यांना कोणाचे आदेश होते, कशा पद्धतीने फोन टॅप केले याबाबतची माहिती तपास अधिकारी (Investigating Officer) घेत आहेत. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी तोंडी आदेश देऊन हे फोन टॅपिंग केल्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फोन टॅप करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole), माजी खासदार संजय काकडे (Former MP Sanjay Kakade), माजी आमदार आशिष देशमुख (Former MLA Ashish Deshmukh) आणि मंत्री बच्चू कडू (Minister Bachchu Kadu) यांचे वेगवेगळ्या नावाने साठ दिवस फोन टॅप केल्याच्या आरोपावरुन रश्मी शुक्ला व इतरांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित असलेल्यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी तयारी केली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे.
याशिवाय, या गुन्ह्यातील तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना देखील जबाब नोंदवण्यासाठी लवकरच बोलावले जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
त्यांची कायदेशीर प्रक्रिया (Legal Process) सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title :- Pune Phone Tapping Case | Pune phone tapping case phone tapping was done
by verbal order of IPS rashmi shukla pune former CP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा