25000 ची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाला 25 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. काही वेळापूर्वी ही कारवाई झाली असून, त्याबाबत पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

उपनिरीक्षक मिलन कुरकुटे असे लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुटे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. दरम्यान आज सायंकाळी तक्रारदार यांच्या कडून सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. एसीबीने केलेल्या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी लाच कशासाठी घेतली हे समजू शकलेले नाही. मात्र, एसीबीचे एक पथक घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like