Pune-Pimpri ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Pimpri ACB Trap | वर्कऑर्डरची फाईल तयार करून संबंधित विभागाकडे पाठविण्यासाठीचा मोबदला म्हणून 1 लाख 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 1 लाख रूपयाची लाच घेणार्‍या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) निविदा विभागातील (PCMC Tender Department) लिपिकाला (PCMC Clerk ) पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Pune Bribe Case). त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune-Pimpri ACB Trap)

 

 

दिलीप भावशिंग आडे (51) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे देखभाल दुरूस्तीची कामे करतात (Pimpri Chinchwad ACB Trap Case). त्यांना शासकीय निविदेनुसार काम मिळाले होते. सदर कामाच्या वर्कऑर्डरची फाईल तयार करून संबंधित विभागाकडे पाठविण्याचा मोबदला म्हणुन आरोपी दिलीप आडे याने तक्रादाराकडे 1 लाख 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 1 लाख रूपयाची लाच घेताना दिलीप आडेला सरकारी पंचासमक्ष मंगळवारी दुपारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवारात रंगेहाथ पकडण्यात आले. (Pune-Pimpri ACB Trap)

 

पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (PI Pravin Nimbalkar), पोलिस कर्मचारी चैतन भवारी, रियाज शेख, चालक देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune-Pimpri ACB Trap | Clerk of Pimpri-Chinchwad Municipal
Corporation PCMC caught in anti-corruption net while accepting bribe of 1 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा