Pune Pimpri Accident | मोबाईलवर बोलत दुचाकी चालवणं बेतलं जिवावर, अपघात होऊन तरुणाचा मृत्यू

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Accident | वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्याने अनेक अपघात होत असतात. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातील (Pune Pimpri Accident) पिंपळे गुरव परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला फोनवर बोलणं जीवावर बेतलं आहे. शैलेश गजानन जगताप Shailesh Gajanan Jagtap (वय-29) असं अपघातात मृत्युमुखी (Accident Fatal) पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव (Pimple Gurav) परिसरातील रामकृष्ण मंगल कार्य़ालय परिसरातून शैलेश हे काटे पुरम चौकाकडे जात होते. दुचाकीवरून जात असताना ते मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी त्यांना रस्त्यावर असणाऱ्या गतिरोधकाचा अंदाज आला नाही आणि ते थेट जवळून जाणाऱ्या स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली पडले. बसच्या चाकाखाली चिरडले गेल्याने शैलेश हे गंभीर जखमी झाले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Pune Pimpri Accident)

शैलेश जगताप यांनी गाडी चालवत असताना हेल्मेटचा वापर केला नव्हता.
त्यांनी जर हेल्मेटचा वापर केला असता तर त्यांचा जीव वाचला असता.
दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. तसेच गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं टाळलं पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title :- Pune Pimpri Accident | a 29 year old youth lost his life in pimpri chinchwad due to a mistake while riding a bike cctv video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ring Road | पुणे रिंग रोडचे काम मुदतीत पूर्ण होणार, शंभूराज देसाईंची माहिती

Cosmetic Surgerie | कॉस्मेटिक सर्जरी करण्याचे काय आहेत फायदे आणि तोटे, एक्सपर्टकडून जाणून घ्या उत्तर

Manasi Naik | प्रदिप खरेराच्या इंन्स्टा रीलवर भडकली मानसी नाईक; म्हणाली….