Pune Pimpri Accident News | विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनीबसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी; चिंचवड येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Accident News | विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वेगातील मनी बसची धडक समोरून येणाऱ्या दुचाकीला बसली. यामध्ये एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू (Death) झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात (Pune Pimpri Accident News) शुक्रवारी (दि.24) रात्री साडेसातच्या सुमारास चिंचवड येथील आकुर्डी लिंक रोडवर (Akurdi Link Road) झाला.

अनिकेत बालाजी गायकवाड (वय-21) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर स्वप्निल पवार व शुभम गायकवाड हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मिनी बस क्रमांक एमएच 14 सीडब्ल्यु 4136 वरील चालकावर आयपीसी 279, 337, 338, 304 (अ) सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्वप्निल संजय पवार (वय-19 रा. ओटास्किम, निगडी) याने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) शनिवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील, अनिकेत आणि शुभम हे तिघे हिरो स्प्लेंडर दुचाकीवरुन (एम एच 14 ई.डी. 8522) ट्रिपल सीट जात होते. चिंचवड येथील आकुर्डी लिंक रोडवरील ग्रीव्हज कॉटन कंपनीजवळ आले असता
समोरुन विरुद्ध बाजूने येणाऱ्या भरधाव वेगातील मिनी बसची धडक दुचाकीला बसली.
यामध्ये अनिकेत गायकवाड याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात मार लागल्याने गंभीर दुखापत होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला.
तर फिर्यादी स्वप्निल याला मुक्का मार लागला असून
शुभम याच्या डाव्या पायाचे एक बोट फ्रॅक्चर झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : साई चौकातील अवैध हुक्का बारवर पोलिसांचा छापा, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त