Pune Pimpri Accident News | दुचाकीची ट्रकला धडक, दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Accident News | ट्रक चालकाने अचानक गाडी थांबवल्याने पाठिमागून आलेल्या दुचाकीची ट्रकला जोरात धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात (Pune Pimpri Accident News) 28 ऑक्टोबर रोजी पुणे-नाशिक रोडवर (Pune-Nashik Road) भोसरी वाहतूक शाखेसमोर (Bhosari Traffic Branch) रात्री साडेनऊच्या सुमारास झाला.

केशव व्यंकट आवळे (Keshav Venkat Awle) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक क्र. एमएच 01 डी.आर 9309 चालकावर आयपीसी 338, 337, 279, मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कंथक प्रकाश म्हस्के (वय-24 रा. मोशी प्राधिकरण) याने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) गुरुवारी (दि.16) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्याचे मित्र केशव व्यंकट आवळे, अमोल बालाजी आवळे हे तिघेजण दुचाकीवरुन (एमएच 14 एल.सी.077) कासारवाडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीसमोरील ट्रक चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून कोणताही सिग्नल न देता ट्रक अचानक रस्त्यात थांबवला. त्यामुळे फिर्यादी यांच्या दुचाकीची धडक ट्रकला बसली.
यामध्ये कंथक म्हस्के याच्या पायाचे हाड फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाला.
तर त्याचा मित्र केशव आवळे हा देखील गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने केशव याला पिंपरी येथील
डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

धक्कादायक! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याला वाहन चोरी प्रकरणी अटक, 8 दुचाकी जप्त, प्रचंड खळबळ