Pune Pimpri Alandi Police | दरोडा टाकणारी टोळी आळंदी पोलिसांकडून 24 तासात गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Alandi Police | मध्यरात्रीच्या सुमरास घरातील लोकांना कोयत्याचा व लोखंडी विळ्याचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 97 हजारांचा ऐवज दरोडा टाकून नेल्याची घटना आळंदी परिसरात घडली होती. दरोडा टाकल्यानंतर आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून पळून गेले. दरोडा टाकणाऱ्या टोळीला आळंदी पोलिसांनी 24 तासात अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. (Pune Pimpri Alandi Police)

याबाबत रमेश विठ्ठल थोरवे (वय-43 रा. चऱ्होली खुर्द, वडगाव रोड ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरुवारी (दि.22) रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान थोरवे हे त्यांच्या कुटुंबासह घरात झोपले होते. त्यावेळी पाच जण त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी थोरवे यांची पत्नी व वडील यांना लोखंडी कोयता, लोखंडी विळ्याचा धाक दाखून घरातील रोख रक्कम व दागिने घेऊन स्कॉर्पिओ (एमएच 42 बीजे 5596) मधून पळून गेल्याचे सांगितले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला. तपास पथक आरोपींचा शोध घेत असताना आरोपी व
गुन्ह्यात वापरलेली गाडीचा दोन तासात शोध घेऊन चार जणांना अटक केली. पोलिसांनी पृथ्वीराज सुखदेव चव्हाण
(वय-26 रा. दापोडी, केडगाव ता. दौंड), कोहीनूर विशाल पवार (वय-21 रा. चोराची आळंदी, ता. हवेली),
धिरज उत्तम चव्हाण (वय-35 रा. दापोडी, ता. दौंड), नरेश धनाजी सकीरा उर्फ हाकला (वय-25 रा. चोराची आळंदी, ता.हवेली)
यांना अटक करुन गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोहार
करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लोहार, पोलीस अंमलदार लोणकर, सानप, खेडकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दारु पिण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्याला पिंपरी पोलिसांकडून अटक, दोन फरार

मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

MLA Sunil Kamble | अखेर पोलिसांच्या अर्जित रजेचा शासन निर्णय रद्द, आमदार सुनील कांबळेकडून निर्णयाचे स्वागत

Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Cyber Crime | लोन क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी गुगलवर सर्च केला अन् खाते झाले क्लिअर; ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा