Pune Pimpri Chinchwad Crime | भागिदार आणि कर्मचाऱ्याकडून कंपनीला 3 कोटींचा गंडा, भोसरी एमआयडीसी परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनी वाढवण्याचे आमिष दाखवून कंपनीत भागीदारी घेऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर संचालक पदावर असताना स्वत:च्याच कर्मचाऱ्याला हाताशी धरून कंपनीची तीन कोटींची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार 2015 ते 2017 या दोन वर्षात एमआयडीसी भोसरी (MIDC Bhosari) येथील ऋतिक टूल्स प्रा.लि. (Hrithik Tools Pvt. Ltd.) येथे घडला आहे.
याप्रकरणी 60 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) गुरुवारी (दि.2) फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीचा संचालक आनंद ईश्वरचंद मित्तल Anand Ishwarchand Mittal (वय-43 रा. वाकड) आणि कर्मचारी तेजश्री भिमशा शेट्टी Tejashree Bhimsha Shetty (वय-37 रा. दिघीरोड, भोसरी) यांच्यावर आयपीसी 409, 406, 420, 477 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीच्या कंपनीची वाढ करण्याचे आमिष दाखवून मित्तल
याने कंपनीत भागीदारी (Partnership) घेतली. संचालक पदावर असताना त्याने कंपनीत तयार झालेले 18 हजार
314 नगांची एकूण 1 कोटी 75 लाख 4 हजार 102 रुपयांच्या चलनावर मित्तल आणि शेट्टी यांनी परस्पर
सही केली. तसेच कंपनीचे कोटींग मटेरिअल 93 हजार 729 नग एकूण 1 कोटी 28 लाख 40 हजार 329
रुपयांच्या चलनावरही परस्पर सही केली व ग्राहकाकडून आलेले 3 कोटी 3 लाख 44 हजार 431 रुपयांचे बिल
न बनवता परस्पर आपल्या खात्यात जमा केले. फिर्य़ादी यांनी बीलबुक तपासले असता हा प्रकार उघडकीस आला.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | 3 Crores of Ganda to the company from the partner and employee, type in Bhosari MIDC area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update