Pune Pimpri Chinchwad Crime | ऑनलाइन काम देण्याच्या बहाण्याने दोन महिलांची 9 लाखांची फसवणूक, वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | ऑनलाइन काम (Online Work) देण्याच्या बहाण्याने दोन महिलांची नऊ लाखांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 21 फेब्रुवारी ते 4 मार्च 2023 दरम्यान थेरगाव येथे घडला आहे. याप्रकरणी उच्च शिक्षीत महिलेने फिर्याद दिली आहे.
याबाबत 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार कनिका चौहान (Kanika Chauhan) नावाने बोलणाऱ्या महिलेच्या विरोधात आयपीसी 420, 419, 406 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी महिलेस फोन करुन त्यांना
लिओ बर्नेट मीडिया ग्रुप कंपनी (Leo Burnett Media Group Company) मध्ये ऑनलाईन रिव्हिव्ह
देण्याच्या कामाचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादी यांना फोन पे द्वारे विविध खात्यांवर ऑनलाईन 8 लाख 25 हजार रुपये भरण्यास भाग पाडले.
तसेच कलाटेनगर येथील आणखी एका महिलेकडून आरोपी महिलेने ऑनलाईन काम देण्याच्या बहाण्याने 65 हजार रुपये घेतले.
त्यानंतर दोन्ही महिलांना कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा परतावा न देता 8 लाख 90 हजार रुपयांची
फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | 9 lakh fraud of two women on the pretext of offering online work, incident in Wakad area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Hemant Rasane | रवीभाऊ, देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा, हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला