Pune Pimpri Chinchwad Crime | अश्लील शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या पतीला बेदम मारहाण; देहुरोड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेला अश्लिल शेरेबाजी करत विनयभंग (Molestation) केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला दोघांनी बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना देहुरोड परिसरात घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Chinchwad Crime) सोमवारी (दि.6) रात्री दीडच्या सुमारास किवळे येथील आदर्श नगर येथे घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

याबाबत पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित गजानन वानरे Amit Gajanan Wanre (वय-32 रा. आदर्शनगर, किवळे), सुलतान युसुफ खान Sultan Yusuf Khan (वय-27 रा. गांधीनगर, देहुरोड) यांच्यावर आयपीसी 354, 354(ड), 427, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला या त्यांच्या पतीला शोधण्यासाठी किवळे येथील आदर्शनगर
येथील कच्चा रस्त्याने जात होत्या. त्यावेळी आरोपी अमित वानरे याने महिलेला हटकले व अश्लील शेरेबाजी
(Obscene Comment) केली. त्यावेळी फिर्यादी यांचे पती तिथे आले. त्यांनी आरोपीकडे जाब विचारला असता,
त्यांना मारहाण केली. फिर्यादी यांचे पतीने पोलिसांना फोन करण्यासाठी फोन काढला असता,
आरोपीने मोबाईल हिसकावुन घेऊन रस्त्यावर आपटून नुकसान केले. त्यानंतर आरोपीने सुलतान खान याला
फोन करुन बोलावून घेतले. खान याने ‘मै इधरका गाववाला हुं’ असे म्हणत फिर्यादी यांना मारहाण केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :-  Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vaalvi 2 | परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांची मोठी घोषणा; ‘वाळवी 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Kasba Constituency Bypolls | जाणून घ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे शिक्षण आणि संपत्ती