Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, तर प्रियकराच्या भावाने केली सोशल मीडियात बदनामी; हिंजवडीमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला तिच्यासोबत काम करणाऱ्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) शारिरीक संबंध ठेवले. तसेच तिच्या क्रेडीट कार्डवरुन खरेदी करुन आर्थिक फसवणूक (Cheating) करत जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. तर प्रियकराच्या भावाने तिची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) सप्टेंबर 2022 ते 19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

 

याबाबत एका तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुनिष शर्मा (Munish Sharma) व शुभम शर्मा (Shubham Sharma) यांच्यावर 308,506, 509,406, 325,323, 34 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

 

पोलीस उपनिरीक्षक यलमार (PSI Yalmar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत कामाला आहे. तरुणी पूर्वी गुजरात येथील एका कंपनीत कामाला होती. त्यावेळी आरोपी मुनिष शर्मा सोबत तिची ओळख झाली. काही दिवसांनी फिर्यादी या हिंजवडी येथील आयटी कंपनीत नोकरी निमित्त आल्या. त्यानंतर मुनिष शर्मा हा देखील हिंजवडीत नोकरी निमित्त आला. दरम्यान तरुणीला राहण्यासाठी फ्लॅट नसल्याने आरोपी मुनिष याने फिर्य़ादी यांनी आपल्या फ्लॅटवर राहण्यास सांगितले. याचदरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध (Love Affair) जुळून आले.

आरोपीने फिर्य़ादी यांना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन 60 हजार रुपयांची खरेदी केली. त्यानंतर मनिष याने फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर मुनिष याचा भाऊ शुभम शर्मा याने स्वत:च्या फेसबुक व इंस्टाग्रामवर पोस्ट करुन फिर्यादी यांच्याबद्दल अश्लिल मजकूर टाकून बदनामी केली.
तसेच आई वडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान, मुनिष याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचे फिर्यादी यांना समजले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | A young woman was sexually assaulted
by luring her into marriage, while her lover’s brother defamed her on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा