Pune Pimpri Chinchwad Crime | पाठलाग करुन तरुणीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, चार जणांना अटक; महाळुंगे परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | कामावरुन घरी जाणाऱ्या तरुणीचा कारमधून पाठलाग करत शिवीगाळ करत तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील (Pune Pimpri Chinchwad Crime) महाळुंगे येथील भैरवनाथ नगर येथे बुधवारी (दि.15) रात्री दहाच्या सुमारास घडला. तरुणीने पोलिसांकडे मदत मागितल्यावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चार जाणांना अटक (Arrest) केली.

 

याबाबत 20 वर्षाच्या तरुणीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) गुरुवारी (दि.16) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विकास राकेस सरवदे (वय-25 रा. चिखली), राजेश रामदास पाटोळे (वय-28 रा. निगडी), ज्ञानेश्वर बाबुराव वैरागे (वय-36 रा. कृष्णा नगर), आकाश मोकींद कांबळे (वय-23 रा. रुपीनगर) यांच्यावर आयपीसी 354 (ड), 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या कामावरुन पायी घरी जात असताना आरोपींनी चारचाकी गाडीतून त्यांचा पाठलाग केला. आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी घाई-घाईत खोलीवर गेल्या. त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला असता आरोपी विकास याने दरवाजा ठोठावला. तसेच मला तुझ्यासोबत बोलायचे आहे दरवाजा उघड असे सांगितले. मात्र फिर्यादी यांनी त्याच्यासोबत बोलण्यास नकार देऊन निघून जाण्यास सांगितले.

त्यानंतर आरोपी विकास सरवदे याने फिर्यादी यांच्या खोलीच्या दरवाजावर हाताने मारुन अश्लिल शिवीगाळ (Obscene Abuse) करुन घरात घुसण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी फिर्य़ादी यांनी पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींवर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Attempt to break into girl’s house by chasing, four people arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना