Pune Pimpri Chinchwad Crime | अनलोडींगच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या 14 माथाडी कामगारांवर खंडणीचा गुन्हा, महाळुंगे MIDC परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून (Transport Company) येणाऱ्या वाहनातील माल अनलोडींग (Unloading) करण्याच्या नावाखाली खंडणी (Extortion) उकळणाऱ्या 14 माथाडी कामागारांवर महाळुंगे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime ) खराबवाडी येथील टोल इंडीय लॉजीस्टीक प्रा.लि. (Toll India Logistics Pvt. Ltd.) कंपनीत ऑक्टोबर 2021 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

याबाबत अभिजीत धनंजय कुलकर्णी (वय-41 रा. तळेगाव दाभाडे) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात (Mahalunge Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रभाकर रामदास तळेकर (वय-34 रा. भोसे ता. खेड), कृष्णा बाबाजी चौधरी (वय-36 रा. पाबळ ता. खेड), राजेश किसन गुळवे (वय-41 रा. जुन्नर), गणेश शिताराम जाधव (वय-44 रा. भोसरी), मोहन कोंडीबा थोरवे (रा. खेड), प्रसाद जालींदर कदम (वय-26 रा. भोसरी), स्वप्नील दिपक टेमकर (वय-37 रा. नारायणगाव), बाळासाहेब सिताराम गाढवे (वय-43 रा. खेड), संजय यशवंत नाईकरे (वय-44 रा. खेड), प्रशांत बबन तळेकर (वय-38 रा. चाकण), नंदकुमार रामदास वायाळ (वय-38 रा. चाकण), नवनाथ धोडीभाऊ खंडागळे (वय-36 रा. चाकण), मोहन दौलत बोंबे (वय-28 रा. पाबळ), सोमनाथ वसंत बोंबे (वय-29 रा. पाबळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे नोंदणीकृत माथाडी कामगार आहेत.
खराबवाडी येथील टोल इंडिया कंपनीत येणाऱ्या आर.एस. ट्रान्सपोर्ट सितारगंज, उत्तराखंड,
आर साई ट्रान्सपोर्ट उत्तराखंड, तिरुपती लॉजीस्टीक होसुर, कर्नाटक व तिरुपती लॉजीस्टीक, मुंबई,
रजनी ट्रान्सपोर्ट बेंगलोर, अर्थव ट्रान्सपोर्ट रांजणगाव, अर्थव ट्रान्सपोर्ट भिवंडी मुंबई व इतर ठिकाणावरुन येणारा
माल कंपनीत गाड्या अनलोड करताना आरोपीनी रोख व गुगल पे द्वारे 200 ते 300 रुपये दररोज 5 ते 10
गाड्यांच्या चालकांकडून घेत होते. आरोपी दिवसाला हजार ते दीड हजार रुपये म्हणजे महिन्याला 25 ते 37
हजार 500 रुपये घेत होते. आरोपींनी 2021 पासून संगनमत करुन चार ते सहा लाख रुपये गाडी
चालकाकडून खंडणी स्वरुपात घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Extortion case against 14 Mathadi workers for extorting extortion in the name of unloading, type in Mahalunge MIDC area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, केटरिंगचे काम करण्याऱ्या पाच महिलांचा मृत्यू; 13 गंभीर जखमी

Ravikant Tupkar | रविकांत तुपकरांचा जामीनअर्ज न्यायालयाने स्विकारला; उद्या सुनावणीची शक्यता…

Balasaheb Thorat | राधाकृष्ण विखेंच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…