पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | गुंतवणुकीवर दररोज एक टक्का जास्तीचा नफा देण्याचे आमिष (Lure of Profit) दाखवून एका व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 12 एप्रिल 2018 ते 3 फेब्रुवारी 2023 या कालावधीत भोसरी येथील चक्रपाणी वसाहत येथे घडला आहे.
याबाबत शशिकांत राजाराम देसाई Shashikant Rajaram Desai (वय-50 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी येथील एका महिलेवर आयपीसी 406, 420 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलेने फिर्यादी यांना गुंतवणुकीवर (Investment) दररोज एक टक्का जास्तीचा नफा मिळेल,
अशी फसवी स्कीम सांगितली. त्यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन चार लाख रुपये गुंतवणूक
करण्यास भाग पाडले. दररोज एक टक्का नफा मिळणाऱ्या स्कीममध्ये पाच वर्षात फिर्यादी यांना त्यांनी
गुंतवलेल्या एकूण रक्कमेपैकी 10 हजार 200 रुपये परत मिळाले.
उर्वरित 3 लाख 89 हजार 800 रुपये मुद्दल आणि त्यावरील नफा न देता आरोपी महिलेने फिर्यादी यांची
फसवणूक (Fraud) केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Extortion of Lakhs from businessman by lure of extra profit of one percent per day, type in Bhosari
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल