Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेचा विनयभंग करत वडिलांना मारहाण, आरोपीला अटक; चाकण परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | जबरदस्तीने घरात घुसून महिलेसोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग (Molestation) केला. तसेच महिलेच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार चाकण येथे घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.19) रात्री पावणे दहाच्या सुमारास खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि.20) चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विजय मोहन राठोड Vijay Mohan Rathod (वय-32 रा. खराबवाडी, चाकण) याच्यावर आयपीसी 509, 354, 452, 324, 427, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या घरामध्ये एकट्या असताना आरोपी जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसला व त्याने अश्लील बोलत त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.
फिर्यादी महिलेने आरोपीला विरोध केला असता त्याने शिवीगाळ (Abuse) करुन तुला इथे राहू देणार नाही अशी
धमकी (Threat) दिली. तसेच घरासमोर पडलेला दगड हातात घेऊन महिलेला मारहाण केली.
त्यावेळी महिलेचे वडील त्यांना सोडवण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही हाताने मारहाण केली.
तसेच घरातील सामानाची तोडफोड केली. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Father beaten for molesting woman, accused arrested; Incidents in Chakan area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पिस्तुलासह काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Ahmednagar Crime News | कोपरगावात पोटच्या लेकाचा खून करून आरोपी महिलेने रचला अपहरणाचा बनाव

Kangana Ranaut | दादासाहेब फाळके पुरस्कारांबद्दल कंगना रणौतने नाराजी व्यक्त करत नेपोटीजमवर केली टीका; म्हणाली…