Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून आधी त्यानं फसवलं, नंतर परिचयातील व्यक्तीने 7.5 लाखांना गंडवलं; पिंपरी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तर तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तीने स्वस्तात गाड्या मिळवून देण्याच्या बहाण्याने साडेसात लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) पिंपरी येथे 16 सप्टेंबर 2022 ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) बुधवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रुपेश शालीग्राम धुरई Rupesh Shaligram Dhurai (वय-38 रा. कमल क्रिस्ट अपार्टमेंट, हुडकेश्वर रोड, कलावती नगर, नागपूर-Nagpur) याच्यावर आयपीसी 376 (2) (एन), 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची शादी डॉट कॉम (Shaadi.com) या साईटवर
ओळख झाली. आरोपीने इंडियन ऑइल अँड नॅचरल गॅस रिसोर्सेस (Indian Oil and Natural Gas Resources)
मध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून
वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यानंतर लग्नास नकार देऊन फिर्यादी यांची फसवणूक (Cheating) केली.
तसेच फिर्य़ादी याच्या परिचयाचे अभिजीत मदने (Abhijeet Madane) यांनी कमी किमतीत गाड्या
मिळवून देण्याच्या बहाण्याने 7 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | First he cheated by showing the lure of marriage, then an acquaintance cheated him of 7.5 lakhs; Incidents in Pimpri area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Nashik Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Swapnil Joshi | मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने व्यक्त केली खंत; म्हणाला ‘या’ अभिनेत्रीबरोबर करायचे होते काम