पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | सुट्ट्या पैशावरून वाद झाल्याने रिक्षाचालकाने ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणत प्रवाशाच्या डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.27) सकाळी साडे अकराच्या सुमारास महाळुंगे कमान येथे घडला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)
याबाबत एका महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रिक्षा क्रमांक एमएच 12 आरपी 0350 वरील चालक रोहन शहाजी गायकवाड (वय-23 रा. बापदेववस्ती, कडाचीवाडी, चाकण, ता. खेड मुळ रा. सदाफुले वस्ती, जामखेड, ता. जामखेड जि. अहमदनगर) याच्यावर आयपीसी 307, 504, 506 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती दोघेजण बँकेच्या कामासाठी महाळुंगे येथे येण्यासाठी
खराबवाडी येथून आरोपीच्या रिक्षातून आले. महाळुंगे कमानीजवळ रिक्षा थांबल्यानंतर फिर्यादी यांच्या पतिने रिक्षाचे
भाडे दिले. भाड्याचे सुट्टे 20 रुपये दिले नाहीत यावरुन आरोपीने फिर्यादी यांच्या पतीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
तसेच ‘मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का? मला तुम्ही ओळखत नाही, माझ्या बद्दल तुम्ही माहिती घेतली नाही,
मी येथील भाई आहे’ असे म्हणत शिवीगाळ केली.
फिर्यादी यांचे पती रिक्षातून बॅग काढत असताना आरोपीने चिडून जाऊन तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत रिक्षा
जवळ पडलेला दगड फिर्यादी यांच्या पतीच्या डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरणार करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Mundhwa Police | पार्कींग केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक