Pune Pimpri Chinchwad Crime | ‘मी हिंजवडीचा भाई, तुझा मर्डर करतो’, वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी; हिंजवडीतील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | ‘मी हिंजवडीचा भाई, तुझा मर्डर करतो’ असे म्हणत वाहतुक नियमन करणाऱ्या वाहतुक पोलिसाला (Traffic Police) बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. याप्रकरणी दोन जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. हा धक्कादायक (Pune Pimpri Chinchwad Crime) प्रकार हिंजवडी फेज -2 (Hinjewadi Phase-2) मधील क्रोमा टि जंक्शन येथे सोमवारी (दि.27) सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

याबाबत हिंजवडी वाहतूक शाखेचे (Hinjewadi Traffic Branch) पोलीस नाईक सोमनाथ रामदास दिवटे Police Naik Somnath Ramdas Divte (वय-36) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित साखरे, प्रथमेश हांडे आणि एका हायवा चालकावर आयपीसी 353, 332, 186, 323, 504, 506, 34 तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अमित साखरे आणि प्रथमेश हांडे यांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ दिवटे हे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास क्रोमा टि जंक्शन
(Chroma T junction) येथे कर्तव्य बजावत होते.
त्यावेळी एक हायवा विरुद्ध बाजूने येत असल्याने फिर्यादी यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला.
याचा राग आल्याने हायवाचे मालक अमित साखरे (Amit Sakhre) आणि त्याचा मित्र प्रथमेश हांडे
(Prathamesh Hande) यांनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला.
तसेच त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

तर अमित साखरे याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन ‘आमची गाडी आडवतो तुझा मर्डर (Murder) करतो मला ओळखले का मी हिंजवडीचा भाई अमित साखरे’ आहे, असे म्हणत फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी आरोपी साखरे याचा मित्र हांडे याने ‘काढ रे हत्यार याचा मर्डर करुन टाकू’ अशी धमकी दिली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | ‘I’m a Hinjewadi Bhai, I’m murdering you’, traffic cop beaten up and threatened with death; Type in Hinjewadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MC Stan | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात

Nandurbar ACB Trap | वाळूचा ट्रक सोडण्यासाठी 70 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Hingoli Crime News | वडील रागावल्याने अल्‍पवयीन मुलाकडून जन्मादात्या बापाची हत्या