Pune Pimpri Chinchwad Crime | सराईत गुन्हेगाराकडून हार-फुले विक्रेत्यावर गोळीबार, दिघे मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | पूर्ववैमनस्यातून एका हार फुले विक्रेत्यावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची घटना दिघीमध्ये घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Chinchwad Crime) शनिवारी (दि.18) रात्री साडे बाराच्या सुमारास चऱ्होली बु. येथील बाआरटी काटे कॉलनी, चोविसावाडी येथे घडली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सिद्धेश सिताराम गोवेकर (वय-28 रा. पद्मावती मंदिराशेजारी, वडमुखवाडी, चर्होली, बु.) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हरीओम पांचाळ (वय-20 रा. वडगाव रोड, आळंदी देवाची, ता. खेड) आणि त्याच्या एका साथीदारावर आयपीसी 304, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act) प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी पांचाळ हा सराईत गुन्हेगार आहे.

पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे (PSI Sunil Bhadane) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश गोवेकर आणि आरोपी हरीओम पांचाळ हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी आणि आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
पूर्वी ते एकत्र असताना त्यांच्यात वाद झाले होते.
शनिवारी रात्री सिद्धेश हा त्याच्या केटीएम (एमएच 14 एच वाय 9526) वरुन आळंदी येथून घरी जात होता.
त्यावेळी आरोपीने त्याच्या गाडीचा पाठलाग केला.

 

बीआरटी काटे कॉलनी बस स्टॉपजवळ सिद्धेश आला असता आरोपी पांचाळ
याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या दिशेने पिस्तूल रोखून दोन गोळ्या झाडल्या.
यामध्ये सिद्धेश थोडक्यात बचावला. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Incident in Dighe, firing on garland-flower seller by innkeeper Dighi Police Station Pune Pimpri Chinchwad Crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑनलाईन जुगार घेणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 7 जणांवर कारवाई

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

Pune Crime News | मेफेड्रोन, चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त