Pune Pimpri Chinchwad Crime | जोडप्याचे रिक्षात अश्लिल चाळे, हटकल्याच्या रागातून रिक्षा चालकाचा खून; दापोडी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | रिक्षात अश्लिल चाळे करीत बसलेल्या जोडप्याला हटकल्याच्या रागातून रिक्षाचालकाचा डोक्यात दगड घालून खून (Rickshaw Driver Murder) केल्याची घटना दापोडी येथे घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Chinchwad Crime) दापोडी येथील गणेश गार्डन फेज तीन येथे रविवारी (दि.19) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे.
अलीम उर्फ अली इस्माईल शेख (वय-42 रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयत अलीचा भाऊ असिफ इस्माईल शेख (वय-46 रा. अक्सा हाईट, चांदतारा मस्जित जवळ, नानापेठ, पुणे) याने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 302, 323, 324, 504, 506 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट एक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अमित बाळासाहेब कांबळे (वय-26 रा. महात्मा फुलेनगर, दापोडी) याला अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अली शेख हा रिक्षाचालक आहे.
रविवारी अली याने त्याची रिक्षा (एमएच 14 जे.पी. 1408) जवळकरनगर येथे उभी केली होती.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो रिक्षा घेण्यासाठी आला.
त्यावेळी आरोपी अमित त्याच्या मैत्रिणीसोबत रिक्षामध्ये अश्लिल चाळे करत होता. मयत अली याने त्याला हटकले.
याचा राग आल्याने आरोपीने अली यांच्या डोक्यात विटा आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime | Indecency in couple’s rickshaw, rickshaw puller killed out of anger; Incident in Dapodi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Jalgaon Crime News | अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून एकाची धारधार शस्त्राने हत्या