Pune Pimpri Chinchwad Crime | अलिशान चारचाकीसाठी विवाहितेचा खून, चिखली परिसरातील घटना; सासरच्या मंडळींवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | किराणा दुकान आणि अलिशान चारचाकी गाडी (Luxury Four-Wheeler) घेण्यासाठी माहेराहून पैसे आण असे म्हणून महिलेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. यानंतर तिचा ओढणीने गळा आवळून खून (Murder) केला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी रचलेला बनाव उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तीन जणांवर खूनाचा गुन्हा (Pune Pimpri Chinchwad Crime) दाखल केला आहे.

 

श्वेता प्रवीण जाधव (वय-27) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती प्रवीण काळूराम जाधव (वय-30), सासरा काळूराम विठ्ठल जाधव, सासू प्रमिला काळूराम जाधव (सर्व रा. जाधववाडी) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत श्वेताचे वडील सोमनाथ हरिभाऊ होले (रा. वानवडी, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.18) उघडकीस आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता आणि प्रवीण यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता.
त्यांना पाच वर्षाचा एक मुलगा आहे. प्रवीण याचे जाधववाडी येथे किराणा मालाचे दुकान (Grocery Store) आहे.
या दुकानासाठी आणि आलिशान चारचाकी गाडी घेण्यासाठी श्वेताने माहेरून पैसे आणावेत, यासाठी तिचा छळ केला.
तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. पती प्रवीण याने श्वेताचा ओढणीने गळा आवळला.
यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिला चक्कर आल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितले.
डॉक्टरांनी श्वेताला तपासून तिला मृत घोषीत केले. शवविच्छेदन अहवालात श्वेताचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Murder of married woman for luxurious four-wheeler, incident in Chikhli area; FIR against in-laws

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhumi Pednekar | भूमीच्या ‘त्या’ लूकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले – ‘कोणीतरी हिला चांगला डिझाईनर द्या….’

Pune News | कैद्यांना नातेवाईकांशी महिन्यातून 3 वेळा बोलता येणार, कारागृह प्रशासनाचा निर्णय

Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन