Pune Pimpri Chinchwad Crime News | फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 11 लाखांची फसवणूक, चिंचवड गावातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | फ्लॅट नावावर करुन देतो असे सांगून बँकेतून घेतलेल्या कर्जाची रक्कम घेतली. मात्र 21 वर्षे झाले तरी अद्यापपर्यंत फ्लॅट नावावर करुन न देता एका ज्येष्ठ नागरिकाची 10 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केली. हा प्रकार 2022 पासून आजपर्यंत चिंचवड गावात घडला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (PCPC Police) एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अतुल किसनराव गिरमे (वय-60 रा. वसंत अॅव्हेनु, पिंपळे सौदागर, पुणे) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) रविवारी (दि. 24) फिर्याद दिली आहे. तर वसंत धोंडीबा गावडे (वय-57 रा. सुरभी बंगला, गावडे पार्क, चिंचवड) याच्यावर आयपीसी 406, 420, 467 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप वसंत गावडे आणि फिर्यादी अतुल गिरमे यांच्यामध्ये चिंचवड गावातील केशवनगर येथील दोन फ्लॅट नावावर करुन देण्याचा 2002 मध्ये व्यवहार ठरला होता. त्यानुसार फिर्य़ादी यांनी आरोपीला दोन फ्लॅटची किंमत मिळून 10 लाख 80 हजार रुपये बँकेतून कर्ज काढून दिले. मात्र आरोपीने अद्याप पर्यंत फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच फ्लॅट मालन मोरेश्वर गावडे यांच्या मालकीचा असताना तो फ्लॅट स्वत:चा असल्याचे भासवून खोटे व बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार केली. याद्वारे फिर्यादी यांना फ्लॅट विक्री करुन आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न, आता…”, रोहित पवारांचे वक्तव्य

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”