Pune Pimpri Chinchwad Crime News | प्लॉट देण्याच्या बहाण्याने 17 लाखांची फसवणूक, व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | प्लॉट देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन 16 लाख 87 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी व्हिजन ग्रुपचे सीएमडी (Vision Group CMD) व व्यंकटेश्वरा डेव्हलपर्स चे संचालक (Venkateswara Developers) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2019 दरम्यान नऱ्हे येथील नवले आयटी पार्क येथील ऑफिसमध्ये घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत भारती राजीव शिखरे (वय-46 रा. वसंत विहार को ऑफ सोसायटी, वैशालीनगर, घाटीपाडा रोड, मुलुंड मुंबई) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन व्हिजन ग्रुपचे सीएमडी योगेश दत्तात्रय भंडारे व व्यंकटेश्वरा डेव्हलपर्सचे दौलतराव उमाजी महाडिक (रा. वाई, सातारा) यांच्यावर आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिजन ग्रुप चे सीएमडी योगेश भंडारे व व्यंकटेश्वरा डेव्हलपर्स चे दौलतराव महाडिक यांनी संगनमत करुन सेव्हन हिल्स प्रकल्प (Seven Hills Project) विक्रीकरीता दाखवला. फिर्यादी यांना प्लॉट क्रमांक 63,64 चे अलॉटमेंट लेटर दिले.
यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी चेक तसेच एनएफडी द्वारे 16 लाख 87 हजार 500 रुपये घेतले.
तसेच पैसे घेतल्या प्रकरणी बनावट पावत्या आरोपींनी फिर्यादी यांना दिल्या.
फिर्यादी यांनी आरोपींकडे वेळोवेळी खरेदीखत करुन देण्याची मागणी केली.
मात्र, त्यांनी खरेदीखत करुन देण्यास टाळाटाळ करुन फिर्य़ादी यांची आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड (PSI Lad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

काळ्या जादूने स्पर्धा परिक्षेत यश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक; पाषाण परिसरातील प्रकार (व्हिडीओ)

तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भवानी पेठेतील घटना