Pune Pimpri Chinchwad Crime News | सफाईचे कंत्राट घेणार्‍या संस्थेविरोधात तक्रारी मागे घेण्यासाठी मागितली ५ लाखांची खंडणी; अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, समाजसेवकाला अटक

पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | मनपाचे टॉयलेट, हॉस्पिटल साफसफाईचे कंत्राट घेणार्‍या संस्थेविरोधात तक्रारी करुन ते अर्ज मागे घेण्यासाठी ५ लाखांची खंडणी (Extortion Case) उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याला स्वारगेट पोलिसांनी (Pune Police) अटक केली असून पाच जणांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत हडपसर येथील एका ४६ वर्षाच्या संस्थाचालकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आर आर भुजबळ याला अटक केली आहे. तसेच प्रल्हाद ऊर्फ केन्हैयालाल गवळी, रामभाऊ ऊर्फ श्रीराम खांडेकर, वैभव डोंबाळे, तुकाराम अर्जुन लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मनपा मुख्य इमारत, हडपसर येथील शंकर मठ, गुलटेकडी येथील जिल्हा विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्थेच्या कार्यालयात २०२२ ते २०२३ दरम्यान घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे मनपाचे टॉयलेट, हॉस्पिटल इत्यांदीची साफसफाईचे कंत्राट घेत असतात. आरोपी हे फिर्यादीचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी आहेत. गवळी, खांडेकर, डोंबाळे यांनी लांडगे व भुजबळ यांच्याशी संगनमत करुन फिर्यादी हे अनुसुचित जाती जमातीचे सदस्य आहेत, हे माहिती असताना फिर्यादी यांचे पुणे मनपाचे टेंडर काढून घेतले. फिर्यादीचे लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या संस्थेविरुद्ध खोटे तक्रारी अर्ज करुन फिर्यादीला त्रास देऊन वेळोवेळी जातीवाचक शिवीगाळ करुन अडीच लाख रुपये खंडणी मागितली. तसेच आर आर भुजबळ याने अर्ज मिटविण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करुन दमदाटी करुन पैसे देण्यासाठी दबाव आणला, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त शिरगावकर (ACP Shirgaonkar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या गुंडावर एमपीडीए कारवाई; नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण, महिला पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडून धमकावणी

कामगार नेते यशवंत भोसलेंना 16 लाखांचा गंडा, राष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या खजिनदाराला अटक

सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त