Pune Pimpri Chinchwad Crime News | संरक्षण दलातील अधिकाऱ्याची तब्बल 74 लाखांची फसवणूक, दापोडी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pune Pimpri Chinchwad Crime News | वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन टास्क तसेच जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक (Cheating) केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) चक्क संरक्षण दलातील अधिकाऱ्यालाच (Defense Officer) 74 लाखांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार आरोपींवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME), दापोडी येथील 34 वर्षीय अधिकाऱ्याने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन ट्रिप अॅडव्हायझर ट्रॅव्हल एजन्सी ( नवी दिल्ली), दोन टेलीग्राम धारक व ट्रॅव्हल एजन्सीच्या कस्टमर केअर धारकावर आयपीसी 420, 34 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 23 मार्च ते 27 सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना 23 मार्च ते 27 सप्टेंबर दरम्यान वारंवार फोन केला. त्यांच्या मोबाईलवर एसएमएस करून एक लिंक पाठवली. त्यावर लॉग इन करण्यास सांगून ट्रीप अॅडव्हायजर ट्रॅव्हल एजन्सी (Tripadvisor Travel Agency) टास्क पोर्टल चालवत असल्याचे सांगितले. टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष फिर्यादीस दाखवण्यात आले.

फिर्यादीस टास्क पूर्ण करण्यास सांगितले. आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून टास्क
पूर्ण न झाल्याने गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी आणखी रकमेची मागणी केली.
त्यानुसार फिर्य़ादी यांनी आरोपींना पैसे दिले. आरोपींनी फिर्यादीकडून एकूण 74 लाख तीन हजार 449 रुपये घेतले. त्यानंतर त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे (Senior PI Shivaji Gaware) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या लोधा व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’!
पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 89 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग

FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले