Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या एकाला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavla Rural Police Station) अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल (Pistol) व जीवंत काडतूस (Cartridge) असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 26 डिसेंबर रोजी वरसोली येथील कचरा डेपो परिसरातील भारत गॅस गोडाऊन जवळ करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ (PI Kishore Dhumal) यांना 26 डिसेंबर रोजी माहिती मिळाली की, एक इसम विना परवाना गावठी पिस्टल जवळून बाळगून फिरत आहे. तो आज वरसोली कचरा डेपो येथील भारत गॅसच्या गोडाऊन जवळ येणार आहे. पोलिसांच्या पथकाने तात्काळ भारत गॅस गोडाऊन जवळ सापळा रचला. पोलीस आल्याचे समजताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांन त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जीवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले आहे. आरोपीवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR)दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल (IPS Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे (Addl SP Mitesh Gatte), सहायक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग सत्यसाई कार्तीक (ASP Satyasai Karthik) यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले (PSI Bharat Bhosale), पोलीस हवालदार विजयकुमार मुंढे, पोलीस हवालदार नितीन कदम, पोलीस हवालदार संतोष शेळके, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक भूषण कदम, पोलीस नाईक किशोर पवार, पोलीस अंमलदार संजयदादा पंडीत, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे, पोलीस अंमलदार ऋषीकेश पंचरास यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्ववैमनस्यातून येरवडा कारागृहात कैद्याचा खून, प्रचंड खळबळ

Bhima Koregaon Shaurya Din | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती

IPS Ritesh Kumar | पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात, मुंबई पेक्षा जास्त पुण्यात प्रतिबंधात्मक कारवाई – पोलीस आयुक्त रितेश कुमार (Video)

Pune PMC News | नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर केबलसाठी विनापरवाना ‘खोदाई’

Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde | मनोज जरांगे यांची पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, ”आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास…”