Pune Pimpri Chinchwad Crime News | अटक टाळण्यासाठी आरोपीचा पोलिसावर हल्ला करुन केला आत्महत्येचा प्रयत्न; देहुरोड मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | महाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या (Theft) गुन्ह्यातील आरोपीला पोलीस पकडण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसावर हल्ला (Attack) केला. तर स्वत:वर ब्लेडने वार करुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempted Suicide) केला. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime News) मंगळवारी (दि.21) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील (Mumbai-Pune Old Highway) देहुरोड येथील सेंट्रल चौकात (Central Chowk Dehu Road) घडला.

 

याबाबत संतोष रामदास काळे Santosh Ramdas Kale (वय-35 रा. देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जलसिंग राजपुतसिंग दुधानी (वय-35 रा. जांभुळगाव ता. मावळ) याच्यावर आयपीसी 353,309352,506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या घटनेत आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचार सुरु आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुधानी याच्यावर महाळुंगे पोलीस ठाण्यात (Mahalunge Police Station) आयपीसी 454, 380, 34 नुसार गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात आरोपी देहुरोड येथील सेंट्रेल चौकात असल्याची माहिती मिळाली.
पोलीस त्याला अटक (Arrest) करण्यासाठी आले असता आरोपीने अटक टाळण्यासाठी पोलिसांच्या अंगावर धावून गेला.
त्याने त्याच्याजवळ असलेल्या ब्लेडने फिर्यादीच्या तोंडावर वार करण्याचा प्रयत्न केला.
तसेच मला पकडले तर तुम्हाला दाखवतो, मी आत्महत्या करतो, असे म्हणत स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करुन घेतले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थिटे (PSI Thete) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Accused attempted suicide by attacking the police to avoid arrest; Incident in Dehuroad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WPL Title Sponsor | IPL पाठोपाठ WPLला मिळाला ‘हा’ टायटल स्पॉन्सर; बीसीआयसोबत केला 5 वर्षांचा करार

Pune Crime News | नोकरीचे आमिष दाखवून ८ जणांची ११ लाखांची फसवणुक; बीपीओ चालकाला अटक

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या