Pune Pimpri Chinchwad Crime News | जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाम्पत्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, खडकी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका दाम्पत्यावर खडकी पोलीस ठाण्यात (Pune Police) अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 डिसेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास टाईप सेकंड, रेंजहिल येथे घडला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 35 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संजय शर्मा (वय-35) व त्याची पत्नी यांच्यावर आयपीसी 354 (ड), 509, 504, सह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर राहतो. मागील चार पाच महिन्यापासून तो फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील इशारे करुन त्यांचा पाठलाग करत होता. फिर्यादी त्यांच्या घरासमोरचा कचरा काढत असताना आरोपीने त्यांचा व्हिडिओ काढला. याबाबत फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपी शर्मा व त्याच्या पत्नीने जातिवाचक शिवीगाळ केली. फिर्यादी महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर विनयभंगासह (Molestation) अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिस्टल बाळगणाऱ्या एकाला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक

मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन विनयभंग, बालाजीनगर परिसरातील घटना

Nashik Crime News | पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या चोरट्याला जालन्यातून अटक, नाशिक गुन्हे शाखेची कारवाई

Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्ववैमनस्यातून येरवडा कारागृहात कैद्याचा खून, प्रचंड खळबळ

Bhima Koregaon Shaurya Din | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती

IPS Ritesh Kumar | पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात, मुंबई पेक्षा जास्त पुण्यात प्रतिबंधात्मक कारवाई – पोलीस आयुक्त रितेश कुमार (Video)

Pune PMC News | नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर केबलसाठी विनापरवाना ‘खोदाई’

Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde | मनोज जरांगे यांची पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, ”आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास…”