Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्ववैमनस्यातून तिघांकडून तरुणावर खुनी हल्ला, एमआयडीसी भोसरीतील घटना

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | “तू मला सारखे पैसे मागून त्रास देतो काय”, असे म्हणत तीन जणांनी एका तरुणावर खुनी हल्ला केला आहे. एमआयडीसी भोसरी येथे गुरुवारी (दि. २०) रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

फैज फहिम शेख (वय १९) असे खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची आई रेश्मा फहिम शेख (४०, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २१) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली.

अर्थव उदय पकाले (२०, रा. पेठ क्रमांक १२, प्राधिकरण मोशी), सूरज रणदिवे (रा. घरकुल, चिखली), विवेक विनोद नाईक ऊर्फ सोन्या, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. (Attempt To Kill)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी आपसात संगनमत करून फिर्यादी रेश्मा यांचा मुलगा फैज याला अर्थव म्हणाला की, तू मला सारखे पैसे मागून त्रास देतो काय? थांब तुला आता जिवंत सोडत नाही. तुला ठार मारतो, असे म्हणत फैज याला लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

तसेच इतर संशयितांनीही पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण केली. विवेक याने हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण केली. जखमी फैज याचा मित्र विशाल गौतम (वय १९) यालाही संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar Prakash Ambedkar | राष्ट्रवादीचा प्लॅन बी तयार; प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार एकत्र येण्याचे संकेत?

OBC Leader Laxman Hake | काही मागण्या पूर्ण काही बाकी; लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित

LIC Saral Pension Plan | LIC Scheme : जबरदस्त योजना… एकदाच लावा पैसे, दर महिना मिळेल १२०००/- रुपये पेन्शन!