Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने पतीकडून गाड्यांची तोडफोड; वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीने घटस्फोटासाठी (Divorce) न्यायालयात अर्ज केल्याने संतापलेल्या पतीने पत्नी राहात असलेल्या सोसायटीत येऊन पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यावेळी त्याला अडवले असता त्याने तरुणाला मारहाण केली. तसेच तरुणाच्या आई-वडिल व मित्राला शिवीगाळ करुन धमकी दिली. हा प्रकार काळेवाडी येथील पाचपीर चौकातील पंचनाथ कॉलनीत रविवारी (दि.24) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अशिष बालाजी पांचाळ (वय-22 रा. पंचनाथ कॉलनी, पाचपीर चौक, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सदाशीव तुकाराम डिगे (वय-50 रा. भाटनगर, पिंपरी) याच्यावर आयपीसी 325, 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांचाळ त्याचे आई-वडील व मित्र सोसायटीमधील पार्कींगमध्ये फिरत होते. त्यावेळी सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीचे नातेवाईक असलेला सदाशीव डिगे सोसायटीत आला. डिगे याच्या पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्याच्या कारणावरून डिगे याने सोसायटीमधील गाड्या फोडू लागला तसेच दगड इकडे तिकडे मारुन शिवीगाळ करु लागला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला अडवले असता डिगे याने पांचाळ यांना हाताने मारहाण करुन उजव्या हाताचा चावा घेऊन जखमी केले. तसेच पांचाळ यांचे आईवडिल व मित्र भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सुर्यवंशी (PSI Nagnath Suryavanshi) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Benefits of Guava | थंडीत का सेवन करावा पेरू? ९९% लोक ‘खावा की खाऊ नये’ याबाबत असतात कन्फ्यूज!

Pune Lok Sabha | ‘है तैयार हम…’ ! लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत; लाखोंच्या उपस्थितीत नागपूर महारॅलीत रणशिंग फुंकणार – माजी आमदार मोहन जोशी

कोरेगाव पार्क, खडकी परिसरात घरफोडी, 14 लाखांचा ऐवज लंपास