Pune Pimpri Chinchwad Crime News | कामगारांचा पीएफ न जमा केल्याप्रकरणी हॉटेलच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल; बालेवाडीतील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून कपात करुन घेतलेली भविष्य निर्वाह निधीची (Provident Fund) रक्कम पीएफ कार्यालयात जमा न करता कामगार व शासनाची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी वायरोका हॉटेल्स Vairoka Hotels (रमाडा Ramada) च्या दोन संचालकांवर (Director) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 ते जानेवारी 2023 या कालावधीत बालेवाडी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 56 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरुन वैभव लांबा व शरद श्रीमंत यादव यांच्यावर आयपीसी 406 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बेंगलोर महामार्गावरील (Mumbai Bangalore Highway) बालेवाडी येथील वायरोका हॉटेल्सच्या आरोपी संचालकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून पीएफ च्या रक्कमेची कपात केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मात्र, कामगारांच्या पगारातून कपात केलेली 38,968 रुपये रक्कम आरोपींनी भविष्य निर्वाह निधी कार्य़ालय पुणे येथे
भरली नाही. कामगारांच्या पगारातून कपात केलेली रक्कम स्वत:च्या आर्थिक फायदासाठी वापरुन कामगार व शासनाचा
विश्वासघात केला. आरोपींनी पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खटाळ (API Khatal) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला

Pune Crime News | उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीकडून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण

MLA Disqualification Hearing | आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरला होणार का? राहुल नार्वेकर म्हणाले…

12 BJP MP Resign | भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेत दिल्लीत महत्वाची बैठक, लोकसभेच्या हालचाली वाढल्या

Pune ACB – FIR On Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी व तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपेवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Avneet Kaur Glamorous Photos | लंडनमध्ये एंजॉय करताना अवनीत कौरने शेअर केले क्यूट फोटो, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लागली आग…

ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल