Pune Pimpri Chinchwad Crime News | चंदननगर पोलिसांकडून दुचाकी चोरणार्‍याला अटक, 7 वाहने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हॉटेलमध्ये वेटरचे काम करत असताना विश्रांतवाडी, चंदननगर, हडपसर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या वाहन चोराला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दोन लाखांच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई शेल पेट्रोलपंपाजवळ करण्यात आली. तुकाराम ईश्वर आव्हाळे (वय-22 रा. जोगेश्वरी हॉटेल, खराडी, मुळ रा. मु.पो. राचन्नावाडी ता. चाकुर जि. लातुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत बळीराम संजय बेळगे (वय-27 रा.खराड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. बळीराम बेळगे यांची दुचाकी (एमएच 26 अेझेड 0152) 24 जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरासमोरून चोरुन नेली होती. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार कोद्रे, जाधव यांना माहिती मिळाली की, दुचारी चोरणारा व्यक्ती चोरीची दुचाकी घेऊन शेल पेट्रोलपंप येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

दुचाकीबाबत आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मागिल तीन ते चार महिन्यांपासून विश्रांतवाडी, चंदननगर, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे सांगितले. आरोपीने चोरलेल्या दुचाकी ज्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या त्या ठिकाणावरुन सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीकडून 1 लाख 95 हजार रुपयांच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीकडून चंदननगर पोलीस ठाण्यातील दोन आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, महेस नाणेकर, श्रीकांत शेंडे, शिवाजी धांडे, संतोष लवटे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, नितीन कांबळे, गजानन पवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कंपनीच्या कामावरुन दोन टोळक्यांमध्ये हाणामारी, सराईत गुन्हेगारासह 6 जणांना अटक; विमाननगर परिसरातील घटना

पुणे : ब्रेकअप केल्याच्या रागातून भररस्त्यात तरुणीला प्रियकराकडून मारहाण

पुणे : ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो लावून कपड्यांची विक्री, दोन लाखांचे कपडे जप्त

‘तुला जास्त मस्ती आली का’ म्हणत तरुणावर सपासप वार, दोन सराईत गुन्हेगारांना अटक; भवानी पेठेतील घटना

Pune Police MCOCA Action | शरद मोहोळ खून प्रकरण : मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर ‘मोक्का’

फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध आणखी एक गुन्हा