Pune Pimpri Chinchwad Crime News | उच्चभ्रू परिसरात घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला चतु:श्रृंगी पोलिसांकडून अटक, 23 लाखांचे दागिने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसले नगर या उच्चभ्रू परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी (Burglary) करणाऱ्या परराज्यातील आरोपीला तपास पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून गुन्ह्यातील 23 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे हिरेजडीत दागिने (Diamond Jewellery) व रोख रक्कम जप्त केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

नरेंद्र बाबु नुनसावत Narendra Babu Nunsawat (वय-27 रा. आरटीसी कॉलनी कमान, टीकेआर कॉलेज इंदिरानगर, मीरपेठ, हैदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीतील भोसले नगर येथे दोन जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना चतु:श्रृंगी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. येरवडा व चतु:श्रृंगी पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करुन आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली होती. आरोपीकडून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले. पथकाने आरोपीच्या मुळ गावी जावून 23 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे हिरेजडीत दागिने (Gold Jewelry) व रोख रक्कम जप्त केली.

आरोपी नरेंद्र नुनसावत हा त्याच्या साथीदारासह परराज्यामध्ये जाऊन तेथील उच्चभ्रू परिसर शोधत होते.
त्यानंतर ज्या घरांना स्लायडिंग विंडो आहेत, अशी घरे हेरुन त्या घरांमध्ये घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न
झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil) करीत आहेत.

ही कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन
कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी
पांढरे (Senior PI Balaji Pandhare), पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman),
पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (PI Jagannath Jankar), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील,
पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके (PSI Rupesh Chalke), पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, इरफान मोमीन,
प्रदीप खरात, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे, किशोर दुशिंग, बाबा दांगडे, श्रीधर शिर्के, सुधीर माने यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न, आता…”, रोहित पवारांचे वक्तव्य

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”