Pune Pimpri Chinchwad Crime News | नोकरीच्या आमिषाने कंपनी मालकाचा 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार, कंपनी मालकाला अटक; म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | नोकरी देण्याचे आमिष (Lure of Employment) दाखवून कंपनी मालकाने एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांकडे तक्रार देण्याचा इशारा पीडित मुलीने दिला असता कंपनी मालकाच्या मित्राने खून करण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime News) ऑगस्ट 2022 मध्ये महाळुंगे गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी कंपनीच्या दोन मालकांना अटक केली आहे.

कंपनी मालक (Company Owner) विजयकुमार जनार्धन पोतदार Vijayakumar Janardhan Potdar (वय-55 रा. संकेश्वर डाईन आयकॉन रावेत, ता. हवेली), मिथुन जोगेंदर कुमार दास Mithun Jogender Kumar Das (वय-28 रा. सारा सिटी समोर, खराबवाडी, ता. खेड मुळ रा. जोडोमु ता. वडंबा, जि. कटक राज्य ओडीसा-Odisha) यांच्याविरुद्ध IPC 376, 506, 34, अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत (Scheduled Castes and Tribes Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याप्रकरणी 19 वर्षीय पीडित तरुणीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

फिर्यादी या नोकरी शोधत असताना त्यांच्या तोंड ओळखीच्या मुलीने एका कंपनीचे मालक असलेल्या
विजयकुमार पोतदार यांचा नंबर दिला. त्यानुसार फिर्यादी यांनी पोतदार यांना फोन करुन कामाची गरज असल्याचे सांगितले.
आरोपीने काम देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांना ढाब्यावर नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
याचा धक्का बसल्याने तरुणीने आरोपीकडे याबाबत विचारणा केली.
त्यावेळी आरोपीने मोबाईलमध्ये तुझे फोटो आहेत. ते व्हायरल करेन अशी धमकी दिली.
या घटनेनंतर आरोपी पोतदार याने वेगवेगळ्या नंबरवरुन फिर्यादी यांना फोन करुन त्रास देऊ लागला.

फिर्यादी यांनी आरोपी पोतदार याला तुझी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर आरोपीचा मित्र मिथुन याने फिर्यादी यांना फोन करुन विजयकुमार याने तुझ्यासोबत काय केले हे मला माहित आहे.
तु जर त्याच्याविषयी कोणाला काही सांगितले तर तुझा मर्डर (Murder) करीन अशी धमकी दिल्याचे
फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे (ACP Prerna Katte) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Company owner rapes 19-year-old girl for job lure, company owner arrested; Incident in Mhalunge MIDC area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

State Cabinet Expansion | राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरचं..; दक्षिण महाराष्ट्रात मिळू शकतात ३ मंत्रीपदे

Nitin Deshmukh | ‘नारायण राणे आणि नितेश राणे यांचा चेहरा पाहिला तर, ते महाराष्ट्रीयन सोडा…;’ आमदार नितीन देशमुख यांची राणे पिता-पुत्रावर टीका