पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) गावठी पिस्तुल (Desi Pistol) बाळगणार्याला सर्व्हे 132 येथील सार्वजनिक रस्त्यावरून अटक केली आहे. त्याच्याकडून 30 हजार रूपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News )
पॅडी सुरेश म्हस्के Paddy Suresh Mhaske (19, रा. राजीव गांधीनगर, सिध्दार्थ कंपनीजवळ, सर्व्हे नं. 132, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार अमोल दबडे आणि पोलिस अंमलदार अमित चिव्हे हे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना आरोपी सर्व्हे नं. 132 परिसरात थांबला असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची पोलिसांनी खातरजमा केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News )
अप्पर पोलिस आयुक्त प्रविण पाटील (IPS Pravin Patil), पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma),
सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande), वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन
(Sr PI Abhay Mahajan), पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे (PI Vijay Khomne) यांच्या मार्गदर्शनाखाली
तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe) ,
पोलिस अंमलदार दयानंद तेलंगे-पाटील, अमोल दबडे, अमित चिव्हे, अनिस तांबोळी, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे,
किशोर वळे, नवनाथ भोसले, सद्दाम शेख, प्रशांत शिंदे, प्रमोद भोसले, पुरूषोत्तम गुन्ला आणि ज्ञानेश्वर शिंदे
यांच्या पथकाने सापळा रचुन आरोपी पॅडी सुरेश म्हस्केला अटक केली.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 30 हजार रूपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल मिळून आले.
दत्तवाडी पोलिसांनी ते जप्त केले असून आरोपीविरूध्द दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. गुन्हयाचा पुढील तपास दत्तवाडी पोलिस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Dattawadi police arrested Desi Pistol holder
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली’ शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काय? अजित पवारांनी सांगितलं…