Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेला बस सुरु करण्यास सांगणे बेतले जिवावर, स्कूल बसचे चाक अंगावरुन गेल्याने चालकाचा मृत्यू; चाकण येथील घटना

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | स्कूल बसचा रिव्हर्स गिअर अडकल्याने बस चालक (School Bus Driver) अडकलेला गिअर काढण्यासाठी बसच्या खाली गेला. त्यावेळी त्याने महिलेला बस सुरु करण्यास सांगितले. महिलेने हयगयीने बस सुरु केली असता बसच्या खाली असलेल्या चालकाच्या छातीवरुन बसचे चाक गेले. यात गंभीर जखमी होऊन बस चालकाचा मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (PCPC Police) महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सुनील वामन खिलारी (रा. राजगुरुनगर, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या बस चालकाचे नाव आहे. याबाबत मयत सुनील यांचा मुलगा अक्षय सुनील खिलारी (वय-27 रा. वैभव बिल्डींग, तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर) याने चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी महिलेवर आयपीसी 304(अ), 338, 279, 427 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.21) सकाळी आठच्या सुमारास चाकण गावच्या हद्दीतील गवते वस्ती येथे झाला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील खिलारे हे स्कूल बसवर (एमएच 14 सी डब्ल्यू 1404) चालक म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास बस बंद पडून रिव्हर्स गिअर (Reverse Gear) अडकला. त्यामुळे सुनिल हे बसच्या पुढील डाव्या चाकाच्या खाली जाऊन अडकलेला रिव्हर्स गिअर काढत होते. त्यावेळी सुनिल यांनी आरोपी महिलेला बस सुरु करण्यास सांगितले.

महिलेने तिच्याकडे कोणताही वाहन चालवण्याचा परवाना नसताना बस हयगयीने सुरु केली.
बस सुरु केल्यानंतर बस रिव्हर्स गेल्याने बसचे चाक सुनील खिलारी यांच्या छातीवरुन गेले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर बस पाठिमागे असलेल्या घराला धडकल्याने घराचे नुकसान झाले.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | सरकारची धडधड वाढली, जरांगे २४ डिसेंबरच्या अल्टीमेटमवर ठाम, म्हणाले, ”कोरोनाच्या नावाखाली…”

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांचे धक्कातंत्र; जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करत, सरकारवर उपरोधिक टीका!

Police Accident News | कर्तव्य बजावून घरी जात असताना पोलीस अधिकाऱ्याचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू, नाशिक पोलीस दल हळहळले

Vijay Wadettiwar On Sanjay Raut | ‘शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवणार’, राऊतांच्या दाव्यावर वडेट्टीवारांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…